सिंधुदुर्ग :


भाजपच्या विधान परिषदेच्या सदस्यांच्या प्रयत्नांना अखेर यश.

पडवे येथील हॉस्पिटलमध्ये covid-19 तपासणी लॅब होणार सुरू.




PRESS MEDIA LIVE :. सिंधुदुर्ग : 

विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  खा.नारायण राणे यांच्या पडवे येथील हॉस्पिटलमध्ये येत्या ८ दिवसांत स्वॅब टेस्ट मशिन साठी भाजपाच्या पाच आमदारांनी प्रत्येकी २० लाखांप्रमाणे १ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती दिली होती. तशी पत्रे देखील जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे सुपूर्त केली होती. त्या निर्णयाला शासनाकडून आज मान्यता देण्यात आली असून आता लवकरच  सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडीकल कॉलेज व लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे, येथे "कोविड-१९ तपासणी लॅब" (Covid-19 Testing Laboratory) साठी" विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, भाई गिरकर, रमेश पाटील यांनी प्रत्येकी २० लाख एवढी रक्कम वर्ग केली होती. आणि आज भाजपच्या विधानपरिषद सदस्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेले आहे. 

विधानमंडळ सदस्य यांना अनुज्ञेय असलेल्या निधीतून एकूण रु.१००.०० लक्ष (अक्षरी रुपये शंभर लक्ष फक्त) एवढी रक्कम सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडीकल कॉलेज व लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे, येथे "कोविड-१९ तपासणी लॅब" (Covid-19 Testing Laboratory)" स्थापन करण्याकरीता येणारा खर्च भागविण्यासाठी नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का. १४८२, शासन मान्यता देण्यात आली आहे:

स्थाविका ०६१६/प्र.क्र.९६/का. १४८२.दि.३१/८/२०१७ अन्वये, "विशेष बाव" म्हणून "कोविड१९ तपासणी लगCold-19Testing Laboratory) कारता शिफारस केलेला निधी आवश्यक आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२०-२१ खाली विहीत केलेली आर्थिक मर्यादेची पडताळणी करुन जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे वर्ग करावा अशा प्रकारच्या सूचना असलेले परिपत्रक शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post