शिरोळ :

   महापुरचा घेर वाढू लागला.



 पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ.
 शिरोळ , तेरवाड, राजापूर, कुरुंदवाड   अन्वडी असे चार बंधारे पाण्याखाली.

PRESS MEDIA LIVE :   शिरोळ :

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तेरवाड, शिरोळ, राजापूर व कुरूंदवाड अनवडी असे चार बंधारे बुधवारी पहाटे पाण्याखाली गेले.पहाटे तेरवाड बंधार्‍यावरून 2 फुटांनी पाणी वाहू लागले. कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास राजापूर बंधार्‍यावरून पाणी वाहू लागल. सायंकाळपर्यंत बंधारा बुडाला होता. त्यामुळे कर्नाटक राज्यातील जुगूळ-मंगावती भागात शेती असणार्‍या शेतकर्‍यांचा संपर्क तुटला. पंचगंगेची उपनदी अनवडी नदीतून पाणी वाहू लागल्याने अनवडी नदीच्या काठावर वसलेल्या कोरवी वसाहत परिसरातही पाणी येईल, असे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post