पुण्यात राष्टवादी काँग्रेस कोथरुड तर्फे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
PRESS MEDIA LIVE : पुणेः काँग्रेसचे अध्यक्ष, लोकनेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूडतर्फे पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कोथरुड येथील महर्षी कर्वे पुतळा चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांकडून शासकीय नियमांचे व फिजीकल डिस्टीन्सिंगचे पालन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने, कार्याध्यक्ष नितीन कळमकर, माजी अध्यक्ष मिलिंद वालवडकर, वरिष्ठ उपाध्यक्ष अर्जुन ननावरे, बाबा खान, महिला अध्यक्ष आरती गायकवाड, युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, युवती अध्यक्ष योगिता बावकर, कामगार सेल अध्यक्ष राजेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, कोथरुडचे उपाध्यक्ष कैलास मकवान, मधुकर भगत, मंदार खरे, विलास सांळुखे, सुनिता खरात, नंदिनी बडदे, अमृता मुळे, श्रीकांत बालघरे, आकाश सोनार, अमोल फाले व अन्य पदाधिकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.