पुणे :

 
सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांचे बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या न्यूज अँकर आमिष देवगण वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. एड.साजिद शेख.

PRESS MEDIA LIVE :   पुणे : (प्रतिनिध ) :  मुस्लीम समाजाच्या भावना दुखविणारा आमिष देवगण या न्यूज 18 इंडियाचे अँकर ला अटक करून त्वरित कायदेशीर करावी  असे निवेदन कोंढवा पोलिस स्टेशन चे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड साहेब यांचे कडे करण्यात आली आहे. भारतातीलच नव्हे तर सर्व जगातील मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले ह. ख्वाजा मोइनोद्दींन चिश्ती रहे. या थोर सुफीसंत असुन भारतातच नव्हे तर संपुर्ण जगात त्यांचे अनुयायी आहेत फक्त मुस्लिम च नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोकाची त्यांच्या वर श्रध्दा आहे .   
अश्या थोर सुफी संता बद्दल चुकीचे  वक्तव्य करणाऱ्या न्यूज अँकर  आमिष देवगण




ला तत्काळ अटक करून त्याचे वर कायदेशीर करण्यात यावी अशी मागणी  कोंढवा येथील अॅड. साजिद शेख , मुबिन खान, शकील शेख,  माजीद भाई,  एजाज शेख , बद्रि भाई, अमन खान व मौलाना फरीद पठाण यांनी निवेदना द्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post