PRESS MEDIA LIVE : पुणे : (प्रतिनिधी )
येथील मार्केट यार्डातील किरकोळ भाजी विक्री रविवार पासून सुरु होणार आहे कोरोना संसर्गामुळे मागील दोन महिन्याहून अधिक काळापासून बंद असलेला मार्केट यार्डातील भाजी विक्रीचा किरकोळ बाजार उद्यापासून (रविवार, दि. 14) सुरू होणार आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात वाढलेले भाजीचे भाव अटोक्यात येण्यास मदत होणार आहे. मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभाग 10 एप्रिलपासून बंद झाला होता. तेव्हापासून किरकोळ भाजी विक्रीचा बाजार सुद्धा बंद होता. मात्र, 31 मे पासून फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग सुरू करण्यात आला , त्यानंतर किरकोळ भाजी पाला बाजार सुरू करण्याबाबतचे पत्र किरकोळ विक्री संघटनेचे अध्यक्ष मनोज पवार आणि सरचिटणीस हनुमंत बहिरट यांनी बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांना दिले होते. त्यावेळी सोमनाथ गायकवाड, प्रकाश ढमढेरे, सुहास रायकर आणि बिभिशन सनादे आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर बाजार सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
या विषयी हनुमंत बहिरट म्हणाले, मार्केट यार्डातील किरकोळ बाजारात 150 व्यापारी आहेत. दररोज अनुक्रमे 50 व्यापाऱ्यांना विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने केलेल्या नियमनांचे पालन करत बाजार सुरू करण्यात येणार आहे. यासाठी बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख, भाजीपाला विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर, फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे, श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, बाप्पू भोसले यांनी सहकार्य केले.
Tags
Latest News