Press media live - : पुणे : माणुसकी जपत करोना प्रतिबंधासाठी केलेल्या उत्तम कामांमुळे पुणे पोलीसांप्रती नागरिकांचा आदर वाढला आहे. सीमेवरील जवानांप्रमाणे पोलिसांच्या कामाचा राज्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.
करोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी पवार यांच्या हस्ते लॉकडाऊन कालावधीत चांगली कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कामगिरीचे बनविण्यात आलेले 'फील द बिट' पुस्तिकेचे पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
Tags
Pune