राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून शंकर (नाना ) हळदणकर यांना संधी द्या
आदर्श पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…_
PRESS MEDIA LIVE : ता. १४ : महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर राज्यपालांच्यावतीने विविध क्षेत्रातील १२ मान्यवरांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणुक होणार आहे. त्यासाठी मुंबईतील उद्योजक शंकर उर्फ नाना हळदणकर यांचे सहकार, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील काम आणि अनुभव लक्षात घेऊन जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आदर्श पत्रकार महासंघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. अशी माहिती आदर्श पत्रकार महासंघाचे मुख्य कार्यकारणी सभासद व सुकाणू समिती सदस्य गणेश राऊळ यांनी दिली आहे.
आदर्श पत्रकार महासंघाचे मुख्य कार्यकारणी सभासद गणेश राऊळ पुढे म्हणाले की, समाजाचे नेते नाना हळदणकर यांनी सामाजिक व सहकार क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम केले आहे. समाज संघटीत करण्यासाठी गेली अनेक वर्ष निरनिराळ्या ठिकाणी महामेळावा, महाअधिवेशन, महास्नेहसंमेलन, निरनिराळ्या जिल्ह्यात विद्यार्थी गुणगौरव समारंभ आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्यांनी राबविले आहेत. तसेच विविध संघटनेच्या कार्यात त्यांचा सहभाग असतो. भंडारी को. ऑप. बँकेवर प्रशासक म्हणुन त्यांनी काम केले आहे. बॉम्बे प्लॉट ओनर असोसिएशनच्या मार्फत मुंबईत सहकारासंबंधी सहकार सोमिनार आयोजित करून जनजागृती व सहकार चळवळ वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. को. ऑप. बँकासंबंधीच्या चळवळीत ते सातत्याने मार्गदर्शन करीत आहेत.
मुंबई आणि कोकणात जिम्नेशियम, शरीर शौष्टव स्पर्धा, शारीरीक क्रीडा स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आदी स्पर्धा मोठ्या प्रमाणात राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे आणि त्यांच्या आरोग्य विषयक कॅम्पचे आयोजन केले आहे. होतकरू विद्यार्थी, आय.ए.एस., आय.पी.एस. व्हावे म्हणन मोठ्या प्रमाणात स्पर्धा परिक्षांचे/सेमिनारचे आयोजन केले आहे. महिलांना स्वयंरोजगार आणि प्रशिक्षण सहकारातून समृद्धीकडे घेऊन जाण्याचे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. अनेक तरुणांना छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन व प्रवृत्त केले आहे. त्यामुळे नाना हळदणकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन त्यांची जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणुक करावी, अशी मागणी आदर्श पत्रकार महासंघाने केली आहे, अशी माहिती श्री. राऊळ यांनी दिली आहे .
Tags
Breaking News