जन्म, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र आता क्षेत्रीय कार्यालयात मिळणार.
उद्यापासून अंमलबजावणी होणार.
PRESS MEDIA LIVE : पुणे .... जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र दि. 16 जूनपासून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात मिळणार आहे. महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय नुकताच घेण्यात आला.महापालिका हद्दीतील नागरिकांना जन्म आणि मृत्यूचे दाखले देण्यासाठी महापालिकेचे कसबा पेठेत स्वतंत्र जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय कार्यान्वित आहे. याशिवाय यापूर्वी नागरिकांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातूनही हे दाखले मिळत होते. मात्र, सध्या ते सगळीकडे सुरू नाही. शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही.
आर्थिक वर्षे संपल्याच्या पार्वभूमीवर सध्या बॅंका, पेन्शन आणि शैक्षणिक कामासाठी जन्म, मृत्यूच्या दाखल्याची आवश्यकता असते. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे नागरिकांना जन्म-मृत्यू कार्यालयात पोहोचणे आणि घराबाहेर पडणे शक्य होत नाही. ही अडचण विचारात घेऊन महापालिका प्रशासनाने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र इ-मेलवर पाठवण्याचा निर्णय घेतला. असे असतानाही अनेक तक्रारी महापालिकेकडे येत होत्या.
या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठक बोलावली होती. याला पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, आयटी विभाग प्रमुख राहुल जगताप, माधव देशपांडे, विजय दहिभाते, सुरेश जगताप,नितीन उदास, तसेच जयंत भोसेकर आणि डॉ.
कल्पना बळीवंत आदी उपस्थित होते.
जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सध्याच्या प्रचलित प्रणालीनुसार 24 दिवसांचा कालावधी लागतो. आरोग्य विभाग, सांख्यिकी-संगणक विभाग आणि क्षेत्रीय कार्यालये यांनी याविषयात आवश्यक समन्वय साधून हा कालावधी कमी करण्याचे आदेश महापौर
Tags
Latest News