इचलकरंजी : चार वर्षाच्या मुलीला खाऊ चे लालुच दाखवून अतिप्रसंग करून खून करण्यात आला.


अतिप्रसंग करून चिमुकलीला विहिरीत टाकून खून करण्यात आला. चंदुर येथील  शाहूनगर मधील घटना.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी (प्रतिनिधी ) :

इचलकरंजीतील चंदुर येथील शाहूनगरमध्ये राहणाऱ्या चार वर्षीय मुलीस चॉकलेट देण्याचे अमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला आणि त्यानंतर तिचा विहिरीत टाकून खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. १५) उघडकीस आली. हे घृणास्पद कृत्य केल्याची कबुली दोघा अल्पवयीन मुलांनी दिली असून दोघांनाही शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान या प्रकरणात पोलिसांना न कळवताच तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच मुलीवर अंत्यसंस्कार केल्याचेही उघडकीस आले आहे. यामुळे इंदिरा गांधी रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी भेट देवून तपासबाबत केल्या सूचना आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post