PRESS MEDIA LIVE : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या "इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर'मध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. मोशीतील मागासवर्गीय वसतीगृहात जेवण, नाष्ट्यात अळ्या सापडल्या आहेत, तर आकुर्डीतील खासगी महाविद्यालयात लहान मुलांना वेळेवर दूध मिळत नाही. नागरिकांच्या जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. दुपारचे जेवण दुपारी साडेतीननंतर तर, रात्रीचे जेवण अकरानंतर मिळत आहे, यावरून प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार समोर आला आहे. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मोशीतील अन्न पुरवठादारावर दंडात्मक कारवाई करून नोटिस बजावली आहे.
Tags
Latest News