*दिनांक 7 मे 2020 रोजी दुपार 4.00 ची वेळ... फोन वाजला...*
फोन उचलताच समोरून बोलू लागले, ''माझी पत्नीे मेरी मायकल डिसोझा हिचे covid-19 आजाराने निधन झाले आहे आणि तिचे अंत्यसंस्कार अग्नी देऊन (अग्निसंस्कार) करून होणार आहे.'' असे मयताचे पती मायकल डिसोझा, राहणार हाडपसर,वैदवाडी समोरून सांगताच तत्काळ मी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून अंत्यविधी ख्रिश्चन रितीरिवाजानुसार झाला पाहिजे, याबाबत *अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ व ए.आय.एम आय.एम.च्या नगरसेविका व गटनेत्या अश्विनी डॅनियल लांडगे* यांनी जबाबदारी स्वीकारून त्याबद्दल महापालिकेच्या आयुक्तांकडून तशी रितसर परवानगी घेतली आहे, असे अधिकाऱ्यांना सांगितले. मृताच्या नातेवाईकांना काळजी करू नका तुमच्या पत्नीचे अंत्यसंस्कार हे ख्रिश्चन रीतिरिवाजानुसारच होणार असल्याचे सांगितले. त्याच क्षणी त्या नातेवाईकांना धीर आला. दुसऱ्या दिवशी दिनांक 8 जून 2020 रोजी सकाळी प्रथम मी स्वतः डॅनियल लांडगे, अॅन्थोनी वाकडे व त्यांचे सहकारी, शैलेंद्र भोसले, विजय आल्हाट आम्ही एकत्र सेंट पॅट्रिक येथील फादर लुईस यांच्याकडे नातेवाईकांसमवेत गेलो. त्यांच्याकडून स्मशानभुमी परवाना घेतला व त्या अनुषंगाने लागणारे सर्व महापालिकेच्या परवानगी कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर हडपसर फातिमानगर येथील इंडियन खिश्चन सिमेट्री येथे जाऊन अंत्यसंस्कारासाठी खड्डा घेण्याचे सांगितले. यावेळी तेथील कामकाज पाहणारे व्यवस्थापक म्हणाले, की कमिटीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे, की मयताच्या नातेवाईकांनी स्वतः JCB च्या सहाय्याने खड्डा घ्यावा. त्या क्षणी मी त्यांना व कमिटी अध्यक्षांना फोन लावला, परंतु त्या क्षणी त्यांचा फोन लागला नाही व पुणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे जर अशा वेळेस कुठल्याही व्यक्तीने मयताची हेळसांड केली अथवा अंत्यसंस्कार करण्यास दिरंगाई केली किंवा अडथळा आणल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल यासंदर्भातले आदेश दाखवले. त्यानंतर तेथील कामगारांनी खड्डा करण्यास मदत केली. इथून पुढे असे कोणालाही अडथळा आणू नका, असे व्यवस्थापकांना सुनावले. *
*अंत्यविधीसाठी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे पदाधिकारी यांना covid-19 या आजाराने मरणाऱ्या व्यक्तीची कशा पद्धतीने दफन केली पाहिजे याबाबत अंत्यविधी करण्यासाठी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, जमीर मोमीन, साबीर सय्यद, अमजद शेख, साबीर तोपखाना, दानिश खान, शेख इब्राहिम यांनी प्रत्यक्षरीत्या दफन विधी करून दाखवली.तसेच आमचे काही सहकारी यांच्या मदतीने फादर लुईस यांच्या प्रार्थनेने संपूर्ण अंत्यसंस्कार पार पडला.*
नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा पद्धतीने जर पुणे शहरात करोना आजाराने मृत्यू झालेल्या ख्रिश्चन समाजाच्या व्यक्तीचा दफन विधी करण्यासाठी अथवा याबाबत अडचणी असल्यास पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.....
1) सौ.अश्विनी डॅनियल लांडगे - (एम.आय.एम नगरसेविका पुणे मनपा) 8830348407
2) श्री.अॅन्थोनी वाकडे - (अध्यक्ष पुणे शहर, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ स्था) :
3) श्री.डॅनियल लांडगे- (कार्याध्यक्ष पुणे शहर,अल्फा ओमेगा ख्रिश्चन संस्था) : 9822412567
Tags
Latest News