पाडळी साकेगाव रस्त्यावरील पुलाचे काम सोळा महिन्यापासून अपूर्ण.

*पाडळीत पाडळी-साकेगाव रस्त्यावरील पुलाचे काम 16 महिने झाले तरी अपूर्णच*
प्रतिनिधी वजीर शेख.....
          पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे पाडळी ते साकेगाव रस्त्यावरील पुलाचे काम तब्बल सोळा महिने झाले तरीही ते अपूर्णच आहे. हे कॉन्ट्रॅक्टर पिलानी यांच्याकडे आहे. यांना वारंवार सांगूनही त्यांनी कामाकडे लक्ष घातले नाही. तरी हे काम कधी पूर्ण होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जर ओढ्याला पाणी आले तर येणाऱ्या जाणाऱ्यांचे खूप हाल होतात. तसेच शाळेत येणाऱ्या मुलांचे ही गैरसोय होईल. तरी या कामासाठी काय अडचण आहे हे कळायला तयार नाही. हे काम लवकरच पूर्ण झाले नाही तर संतप्त परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहणार नाही तरी त्याचे जे पिलानी ठेकेदार आहे त्यांनी लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे. नाहीतर पुढील घटनेस ठेकेदार स्वतः जबाबदार राहतील असे परिसरातील नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सध्या पुलाचे काम कपडे वाढण्यासाठी उपयोग केला जात आहे. हा पुल येण्या-जाण्यासाठी आहे की कपडे वाळवण्यासाठी हे ज्वलंत उदाहरण पहा......

Post a Comment

Previous Post Next Post