नायगांव :

*मुस्लिम धर्मगुरू अजमेर चे जग प्रसिद्ध दर्ग्याचे हजरत खाजा मैनोद्दीन चिस्ती रहमतुल्ला बदल न्यूज १८ चे अँकर अमिश देवगण यांनी अपशब्द बोलून धार्मिक भावना दाखवल्या बद्दल व दोन समाजात तेथ निर्माण केल्याबद्दल त्यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी



PRESS MEDIA LIVE :.( नायगांव बाजार प्रतिनिधी)  : 

       दि. १५.०६.२०२० रोजी संध्याकाळी ७:३० वा. न्यूज १८ या वृत्त वाहिनीवर अमिश देवगण नावाचे अँकर "आर पार " या नावाचे डिबेट घेत होते व बोलता बोलता त्यांनी अजमेर दर्ग्याचे खाजा मैनोद्दीन चिस्ती बद्दल खालील प्रकारचे अपशब्द बोलले ज्यामुळे मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखावले गेले आहे. "आक्रांता चिस्ती आया, लुटेरा चिस्ती आया  इसके बाद धर्म बदले " असे प्रकारचे अपशब्द वारंवार बोलण्यात आला हजरत खाजा मैनोद्दीन चिस्ती हे जगप्रसिद्ध मुस्लिम धर्मगुरू आहे व आज हि भारतात व जगात त्यांचे करोडो अनुयायी मुस्लिम शिवाय इतर समाजाचे लोक पण त्यांचे अनुयायी आहेत. आणि हि बाब अमिष देवगण सारखे बे अखली  अँकर ला माहित नाही अस नाही त्याने जाणून बुजून धर्मगुरू बद्दल  अपशब्दांचा  वापर केला आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केले असून जगातल्या  तमाम मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून न्यूज अँकर १८ चे अँकर अमिश देवगण विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावे असे   विनंती अर्ज सह पोलिस निरीक्षक सुमनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आले प्रमुख उपस्थित नरसी व नायगाव चे जमात रजा ये मुस्ताफा अध्यक्ष खारी शाहेद रजा.यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले  नुरानी मजीद चे सदर हाजी अबजल साब.नायब सदर हाजी रजाक साहेब. मका मजिद चे सदर शेख युसूफ मंजुमीया.महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाण नादेड जिल्हाअध्यक्ष सय्यद अजिम हाजी हुसेन साहेब व ईस्माईल मोजन. सय्यद इसाक साहेब.पोलीस पाटिल ईबराईम बेग.गौस मामु पेलवान.मौलाना अल्ताफ रजा.एजास रजा. नायगाव येथे पोलिस निरीक्षक पडवळ साहेब यांना नायगाव चे सामाजीक कार्यकर्ते अब्दुल करीम चऊस.जुनेद मोला खान साब.ईसा अब्दुल कादर सय्यद अली बाबु साब.सय्यद जमिल.सय्यद महेबुब साब.सय्यद बाबु साब .तोफीक बागवान. व सर्व सामाजिक संघटना गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post