मालवण : पंचायत समिती.

मालवण पंचायत समितीचा उपक्रम अभिनंदनीय-आदर्शवत...!

जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांचे गौरवोद्गार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  शाळा सुरू नसल्या तरी विध्यार्थी राहणार शिक्षणाशी जोडून

नेमके काय असणार अँप मध्ये..... वाचा सविस्तर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा कधी व कश्या पद्धतीने सुरू कराव्यात यावर देश पातळीवर उच्चस्तरीय चर्चा सुरू असताना विध्यार्थी शिक्षणाशी जोडून राहावेत या हेतूने मालवण पंचायत समितीने बनवलेले प्रायमरी एज्युकेशन 'विद्यालय' अँप हा उपक्रम अभिनंदनीय व आदर्शवत असाच आहे. असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, या उपक्रमास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनीही

पाठिंबा दर्शवला आहे. आम्हीही मालवणचा हा उपक्रम राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवू. असेही डॉ. वसेकर यांनी स्पष्ट केले. तसेच कोरोना काळात सर्व खबरदारी घेऊन मालवण शिक्षण विभागाने हे अँप विध्यार्थी वर्गापर्यंत पोहचवावे. असेही आवाहन त्यांनी केले.

मालवण पंचायत समिती येथील छत्रपती संभाजी राजे सभागृहात विद्यालय अँप चा उदघाटन सोहळा डॉ. हेमंत वसेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिप उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा मालवण गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, जिप शिक्षण सभापती सावी लोके, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सहायक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, महिला व  बालविकास अधिकारी कौमुदी रसाळ, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, जिप सदस्य सरोज परब, जेरॉन फर्नांडिस, पस गटनेते सुनील घाडीगांवकर, सदस्य मनीषा वराडकर, अशोक बागवे शिक्षण तंत्रज्ञ, शिक्षण विभाग विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख शिक्षक उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

कसे असेल 'विद्यालय' अँप

तिसरी ते सातवी या वर्गाचा अभ्यासक्रम स्मार्ट पीडीएफ च्या माध्यमातून अँप द्वारे उपलब्द आहे. सोबत स्वाध्याय तसेच अधिक माहितीसाठी युट्युब लिंक व  काही शब्द, वाक्य यांची अधिक माहिती एका क्लिक द्वारे विद्यार्थ्यांना उपलब्द होणार आहे. सुरवातीला इंटरनेटच्या माध्यमातून हे अँप व त्यातील माहिती डाउनलोड करावी लागेल. त्यानंतर इंटरनेट उपल्बध नसले तरी ऑफलाईन पद्धतीत अँप सुरू करता येणार आहे. याचा अधिक फायदा इंटरनेट उपलब्द नसलेल्या ग्रामीण भागात विद्यार्थ्याना होणार आहे. लवकरच हे अँप मोबाईल मध्ये प्ले स्टोअरलाही उपलब्द असणार आहे.

अँप साकारणारे तंत्रस्नेही शिक्षक व तंत्रज्ञ यांचा सन्मान

मालवण पंचायत समितीचे शिक्षणप्रिय सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांच्या संकल्पनेतून गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय अँपची निर्मिती झाली. अवघ्या काही दिवसात मालवण शिक्षण विभागाचे तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे, विनीत देशपांडे, गुरुनाथ ताम्हणकर, परशुराम गुरव, दिनकर शिरवलकर, भागवत अवचार यासह तंत्रज्ञ नंदकिशोर हळदणकर यांनी अँप साकारले. या टीमचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हे सातही शिक्षणवीर आहेत. यापूर्वीही आपल्या संकल्पनेतील इंग्लिश स्पिकिंग डे हा उपक्रम शाळा स्तरावर यशस्वी करण्यात शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची राहिली. यापुढेही मालवण पंचायत समितीचे आदर्शवत काम असेच सुरू राहील. असा विश्वास सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी व्यक्त केला.

शिक्षणप्रेमी युवा सभापती

मालवण पंचायत समितीचे युवा सभापती अजिंक्य पाताडे हे नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना साठी ओळळले जातात. त्यांच्या संकल्पनांना उपसभापती राजू परुळेकर यांची अनुभवी साथ नेहमीच लाभली आहे. सोबत गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे मार्गदर्शन व पंचायत समितीचे सहकार्य मिळाले आहे. त्यांचा 'विद्यालय अँप' हा उपक्रमही यशस्वी ठरेल. सर्व विध्यार्थी पालक वर्गापर्यत पोहचेल. असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

मल्टीटॅलेंटेड बीडीओ ; सर्वांकडून कौतुक

जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी 'मल्टीटॅलेंटेड पराडकर' यशा शब्दात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा मालवण गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे कौतुक केले. जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्याने केलेले हे कौतुक मालवण तालुक्यासाठी अभिमानस्पद म्हणावे लागेल. "ज्या ठिकाणी राजेंद्र पराडकर बीडीओ आहेत त्या ठिकाणी कोणतेही नाविन्यपूर्ण उपक्रम संकल्पना यशस्वी करणे शक्य" असल्याचे सांगत, शिक्षण सभापती सावी लोके यांनी कौतुक केले. तर माजी जिप अध्यक्ष सरोज परब, सभापती माधुरी बांदेकर, शिक्षणाधिकारी आंबोकर यांच्यासह सर्वांनीच बीडीओ पराडकर यांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post