कोल्हापूर : सतरा बंधारे पाण्याखाली.

जिल्ह्यातील सतरा बंधारे पाण्याखाली... पावसाची धडाकेबाज बॅटिंग..




PRESS MEDIA LIVE :  कोल्हापूर : 

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी (दि. १६ जून) दिवस आणि रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे नद्या दुथडी वाहू लागले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. तर बुधवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी २२.७ फुटांवर पोहोचली.

जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. पंचगंगेवरील राजाराम, शिंगणापूर बंधार्‍यांसह १७ बंधारे पाण्याखाली गेले. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात धुवाँधार पाऊस होता.

Post a Comment

Previous Post Next Post