खोची : आगामी गळीत हंगामात सात लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट.

     
 

सात लाख टन ऊस गाळपचे उद्दिष्ट : अध्यक्ष राजेंद्र पाटील येड्रावकर.



 



PRESS MEDIA LIVE :   खोची : 

शरद सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामात सात लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. ते नरंदे ता. हातकणंगले येथील शरद सहकारी साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. आगामी एकोणिसाव्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून करण्यात आला.
कारखान्याने सर्वच हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर दिला आहे. वेळेवर ऊसाची बिले देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आगामी ऊस गळीत हंगामही पूर्ण क्षमतेने उत्तम रितीने यशस्वी केला जाईल असे यावेळी मंत्री डॉ.राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

यावेळी युवा नेते आदित्य पाटील-यड्रावकर व संचालक तात्यासाहेब भोकरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.कार्यक्रमास जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष व कारखान्याचे संचालक संजय पाटील-यड्रावकर, नरंदे सरपंच रवींद्र अनुसे, कारखान्याचे उपाध्यक्ष थबा कांबळे, संचालक बबन भंडारी, डी.बी.पिष्टे, गुंडा इरकर, आप्पासाहेब चौगुले, अजित उपाध्ये, संजय बोरगावे, संजय नांदणे, कार्यकारी संचालक एस.एन.डीग्रजे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.आवटी, चीफ इंजिनियर इस्माईल मुलाणी, चीफ केमिस्ट ,चीफ अकौंटट सी.बी.बिरनाळे, बळवंत बेलेकर, कार्यालयीन अधिक्षक अनिल पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post