जिल्हा रुग्णालया ने कोरोना काळात केलेल्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार.
जिल्हा शल्यचिकित्सकावर मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप
PRESS MEDIA LIVE : कणकवली :
कणकवली प्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात यापुर्वी कोरोना काळामध्ये झाडू, फिनेल वगैरे खरेदी चढय़ा दराने जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या लातूर येथील जिल्हा मर्यादीत संस्थेकडून खरेदी करण्यात आल्या आहेत.त्यानंतर आता कोविडसाठी आलेल्या लाखो रुपयाच्या निधीतून अनावश्यक व निकृष्ट दर्जाच्या वस्तुची खरेदी करून खरेदीचा भ्रष्टाचार सुरूच असल्याचा गंभीर आरोप मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.
माहितीच्या अधिकारात सर्व माहिती घेऊन जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.महाराष्ट्र राज्यशासनाकडे सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते देण्यासाठी पैसा नसताना कोविडसाठी प्राप्त झालेल्या निधीची अशाप्रकारे उधळपट्टी करून अनावश्यक व निकृष्ट दर्जाच्या वस्तु खरेदी करण्याचे काम जिल्हा शल्य चिकीत्सक, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक व त्यांचे भांडारपाल यांच्यामार्फत सुरू आहे.
मार्च २०२० पासून कोविडमुळे आलेल्या निधीतून खासगी पुरवठादाराकडून साहित्य खरेदी करीत असताना चढय़ा दराची दरपत्रके एकाच पुरवठादाराकडून प्राप्त करून घेऊन अनावश्यक खरेदी करून मोठय़ा प्रमाणात भष्टाचार करण्याचे कार्य वरिष्ठ अधिकारी करत आहेत. कोरोना वार्डमध्ये एनआरएचएम मधून नियुक्त झालेले डॉक्टर कारभार सांभाळीत आहेत. कार्डिअोग्राम टेक्निनशियन काहितरी कारणे पुढे करून कार्डिओग्राम काढण्यास नकार देत आहेत. सदर कर्मचारी २००३ पासून प्रतिनियुक्तीवर जिल्हा रुग्णालयात असून सध्याच्या स्थितीत आपल्या आजाराचे कारण दाखवून कार्डिओग्राम काढण्यास नकार देत असेल तर दुसरा कर्मचारी नेमण्याची गरज असताना शल्य चिकीत्सक त्यांना पाठीशी घालत आहेत. यापुर्वी एनआरएचएम खाली एक आहारतज्ञ व एक फिजीओथरपीतज्ञ यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांना शल्य चिकीत्सकांनी कार्डीओग्राम काढण्याची जबरदस्ती केल्याने दोन दिवसांतच दोघेहि काम सोडून गेले आहेत.
नर्सिंग स्टाफचे इंचार्ज नदाफ यांची सेवानिवृत्ती जवळ आलेली असताना त्यांना विविध मार्गानी त्रास दिल्याने सिव्हील सर्जन यांच्या जाचामुळे त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शिवाय त्यांना पेंशन रोखण्याची धमकी देण्यासारखे प्रकार घडत आहेत. आपला भ्रष्टाचारी कारभार दडपण्यासाठी सर्व स्टाफवर दहशत निर्माण करण्याचे धोरण जिल्हा रुणालयात राबविले आहेत.
जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या वागणूकीबाबत जिल्हा रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफने निवेदन दिलेले असल्याचे समजते.सिंधुदुर्गातील आठ ही तालुक्यामध्ये कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शासनाने सुमारे ७७ लाख रुपयाचा निधी मंजूर केल्याचे समजते. तो प्राप्त झालेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या ७७ लाख निधीतून अडीज ते तीन हजारात मिळणारी थर्मलगन दहा हजार रुपयाने खरेदी करण्यात आली आहे. गन बंद पडल्यास वापरणार्याने भरपाईचा फतवा काढल्याने गन वापरली ही जात नाही आहे. तसेच दिड ते दोन हजाराना मिळणारा पल्स ऑक्समिटर 5 हजाराने खरेदी केली असून त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. तसेच त्यांना वॉरंटी, अथवा गॅरंटी मिळालेली नाहि. काही मशिन्स काही दिवसांतच बंद पडल्या आहेत. त्या गरजेपेक्षा जादा खरेदी करण्यात आल्या असल्याचे समजते आहे. याशिवाय खरेदी करण्यात आलेल्या गाद्यासुद्धा अनावश्यक अधिक आणि चढ्या दराने खरेदी करण्यात आलेल्या आहेत.
आठ तालुक्यापैकी काहि कोविड सेंटर हे काहि तालुक्यात सुरू करण्यात आले आहेत. परंतु, काहि अद्याप सुरू नाहि आहेत. सदरील कोविड सेंटर हे सुरू असलेल्या उपजिल्हा रुगालयावर कोणताहि ताण पडू न देता स्वतंत्र स्टाफ देऊन ते सुरू करावयाचे आहेत. तालुका कोविड सेंटर हे जि.प. आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण ठेऊन त्यांच्यामार्फत या कोविड सेंटर सेंटरवर पैसे खरेदी करावयाचे असताना ते शल्य चिकीत्सकांनी स्वत:च्या मर्जीने खरेदी करून भ्रष्टाचार चालविला आहे.शासनाने सर्वप्रथम जिल्हा रुग्णालय हे संपुर्ण कोविड सेंटर म्हणून घोषीत असून तेथे ३०० बेड उपलब्ध आहेत.येथे इतर रुग्णावर उपचार केले जात नाहित. अन्य आजारावरील रुग्ण उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविले जातात. त्यांचा स्टाफ काढून तालुका कोविड सेंटरला देण्यात आला आहे. त्यामुळे कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफवर कामाचा ताण वाढला आहे. तालुका कोविड सेंटर डीएचओ व टीएमओ यांच्यामार्फत जि.प.च्या डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफमार्फत चालवून उपजिल्हा रुग्णालयाचा ताण कमी करण्यात यावा. तसेच सावंतवाडी व कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होत असतील तर त्यांच्या ऑपरेशन थिएटरसाठी लागणाऱया आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अपुऱ्या पडत असल्याने कोविड रुग्ण व्यतिरीक्त असलेल्या रुग्णावर उपचार देणे डॉक्टराना कठिण होत आहे.वास्तविक पाहता तालुक्यातील कोविड सेंटर हि जिल्हय़ामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर जिल्हा रुग्णालयातील ३०० बेड भरल्यानंतर अतिरीक्त व्यवस्था म्हणून तालुका कोविड सेंटर सुरू व्हावीत, अशी आमची खात्रीलायक माहिती आहे.
जिल्हा रुग्णालय हे पुर्णत: कोविड सेंटर असल्याने जिल्हय़ातील कोरोनाबाधीत सर्व रुग्णांना जिल्हा रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. कारण त्या रुग्णालयामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांना सर्व प्रकारचे औषधउपचार देण्यासाठी आवश्यक तज्ञ डॉक्टर, नर्सेस, स्टाफ अत्यावश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. सध्या ५० ते ६० कोविड रुग्ण उपचार घेत असून कोरोनाची लक्षणे असलेल्याना अन्य वॉर्डमध्ये ठेवणे आवश्यक आहे.
तसेच तालुका कोविड सेंटर हे मुंबईमध्ये ज्याप्रमाणे इमर्जंसी म्हणून वापरण्याची गरज असल्याने तेथे रुग्णवाहिका, डॉक्टर्स नर्सेस वगैरे अत्यावश्यक स्टाफ व इतर व्यवस्था ठेवावी लागणार आहे. त्यामुळे येथील कामाचा भार कमी करण्यासाठी रुग्णांना जिल्हा रुग्णालय येथे पाठविले जावे. परंतु, तसे होताना दिसत नाहि. म्हणूनच या सर्व तश्या प्रकारची माहिती माहितीच्या अधिकारात प्राप्त करून घेण्यात येणार आहे. त्यापुर्वी जिल्हा रुग्णालयाची हि परीस्थिती शासनापर्यंत पोहचविण्यासाठी व या अंदाधुंद कारभारची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे व शासनाच्या सचिवांकडे करण्यात येणार असल्याचे उपकरकर यांनी म्हटले आहे.
Tags
Latest News