थकीत पगारासह अन्य मागण्यांबाबत ग्रामपंचायत कामगारांचे काम बंद आंदोलन सुरूच
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास.
ग्रामपंचायत ने एक महिन्याचा पगार व जुलै महिन्याचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर जमा करीत असून उर्वरित रक्कम घरफाळा वसुलीतून देण्यात येण्याची लेखी हमी दिली व कामगारांनी आंदोलन स्थगित करावे असे आव्हान सरपंच सुनील स्वामी व ग्राम विकास अधिकारी बी टी कुंभार यांनी केले. त्यानंतर कामगारांनी बैठक घेऊन दोन महिन्याचा पगार द्यावा व भविष्यनिर्वाह निधी रक्कम किती तारखेपर्यंत खात्यावर भरणार ह्याबाबत लेखी पत्र ग्रामपंचायतीने देऊ केल्यास कामगार आपले काम बंद आंदोलन मागे घेतील अशी सूचना कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे केलेली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व कामगार आपल्या मताशी ठाम असल्यामुळे असल्यामुळे काम बंद आंदोलन अद्यापही सुरूच आहे अध्यापन कोणताही तोडगा निघाला नाही. लॉकडाऊनमुळे घरफाळा वसुली झालेली नाही.
मिळकत धारक ही भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार व भविष्यनिर्वाह निधीची थोडीफार रक्कम कामगारांना देण्यासाठी उसनवारी रक्कम घेतल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले आहे. दरम्यान कामगारांचे आंदोलन असेच पुढे चालू झाल्यास गावातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊन गावासाठी की रोग पसरण्याची शक्यता आहे. तेव्हा ग्रामपंचायत व कामगार संघटनेने योग्य तोडगा काढून लवकरात लवकर हा संप मिटवावा अशी चर्चा सुरू आहे. कबनूर येथील ग्रामपंचायतीच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्या बाबत हातकणंगले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचीभेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
Tags
Latest News