जनधन ची रक्कम खातेदाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी फेर निवेदन.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जोरदार पाठपुरावा सुरू.
PRESS MEDIA LIVE : ( जयसिंगपूर) :
जयसिंगपूर : गोरगरीब जनतेला बॅक व्यवहार करता यावा यासाठी बॅकेत झिरो बॅलन्स मध्ये जनधन खाते उघडणेत आले आहेत. माञ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेने या जनधन खातेतील शिल्लक रक्कमेवर हाफ ईयरली चार्जेस पोटी वर्षाकाठी रू 141:60 इतकी सन 2015 पासुन कपात केली आहेत.सदरची कपात केलेली रक्कम ज्या त्या खातेदारांच्या खातेस जमा करण्यासाठी 15 मे रोजी निवेदन दिले होते. या वर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला , माञ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी जनधन खातेतील कपात केलेली खातेउतारा घेऊन बॅक मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांना दाखविले असता याबाबत माहिती घेऊन कळवितो असे बोलले.सदर निवेदनची एक प्रत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनाही देणेत आला आहे.या निवेदनावर शिरोळ तालुका युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष बंडू पाटील,संघटनेचे कार्यकर्ते विश्वास बालीघाटे, योगेश जीवाजे, बंडू उमडाळे, सामाजिक कार्यकर्ते रमेशकुमार मिठारे,बाहुबली मालगांवे यांच्या सह्या आहेत .