इचलकरंजी :


इचलकरंजीचे मा.आमदार अशोकराव जांभळे यांच्या वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षरोपण करण्यात आले.


PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी :  ( मनु फरास )


इचलकरंजीचे माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध पदाधिकार्‍यांच्या निवडीही यावेळी करण्यात आल्या.
वाढदिवसानिमित्त अशोका हायस्कूल, हिरा-राम गर्ल्स हायस्कूल व अशोक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना नगरसेवक लतिफ गैबान व इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन जांभळे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजू खोत, निहाल कलावंत, राहुल ज्वारे, विरेंद्र पाटील, रवि कांबळे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
शिवशंभोनगर येथे योगेश खांडेकर, विकासनगर परिसरात सुरेश गंथडे, गणेशनगर येथे आनंदा म्हेतर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नितीन जांभळे व मेहबुब मुजावर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आनंदा काटकर, रवि सुतार, अमोल भाटले, अनिकेत गुरसाळे, गुड्डू शेख, राहुल पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या. त्यामध्ये अनिकेत संजय गुरसाळे (सोशल मिडीया हातकणंगले तालुका अध्यक्ष), अमोल दगडू भाटले (राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल इचलकरंजी शहर अध्यक्ष), समीर रमजान नदाफ (इचलकरंजी विधानसभा अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष), रविंद्र शितल कांबळे (इचलकरंजी विधानसभा मागासवर्गीय सेल अध्यक्ष) यांना राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, नगरसेवक नितीन जांभळे यांच्या हस्ते निवड पत्रे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेब देशमुख यांनी, नवीन पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे आणि नेते खासदार शरद पवार यांचे विचार तळागाळात रुजवावेत असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post