PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : (प्रतिनिधी) :
या बैठकीमध्ये इचलकरंजीला लागणाऱ्या पाण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. तसेच वारणा योजनेतून पाणी न आणता दुधगंगा नदीवरून कागल तालुक्यातील सुळकुड गावातून पाण्याचा उपसा करण्याची मोहीम चालू करण्यास राज्य सरकारची मोहीम चालू करण्यात आली आहे. तसेच सुळकुड गावापुढे नवीन बंधारा बांधून त्यातून पाणी उपसा करण्याचे नियोजन राज्य सरकारकडून आखण्यात आलेले आहे. या दुधगंगा नदीवरून सुळकुड येथून पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेस मंजुरी मिळाली आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पाहणी करून योजनेचा खर्च व आराखडा ३१ जुलैपर्यंत सरकारला सादर करावा असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला. या योजनेसाठी पाण्याचे आरक्षण करण्यासंबंधीचे आदेश कागल तालुक्यातील सुळकुड गावातून पाण्याचा उपसा करण्याची मोहीम चालू करण्यास राज्य सरकारची मोहीम चालू करण्यात आली आहे. तसेच सुळकुड गावापुढे नवीन बंधारा बांधून त्यातून पाणी उपसा करण्याचे नियोजन राज्य सरकारकडून आखण्यात आलेले आहे. या दुधगंगा नदीवरून सुळकुड येथून पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेस मंजुरी मिळाली आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पाहणी करून योजनेचा खर्च व आराखडा ३१ जुलैपर्यंत सरकारला सादर करावा असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला. या योजनेसाठी पाण्याचे आरक्षण करण्यासंबंधीचे आदेश पाटबंधारे विभागला देण्यात आले आहेत. तसेच सदर योजनेचा खर्च राज्य योजनेतून करण्यास नगरविकास मंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी मान्यता दिली.यामुळे येण्याऱ्या काळात इचलकरंजीचा पाणीप्रश्न नक्की सुटेल व शहरवासीयांना शुद्ध पाणी पिण्यास मिळेल.
यावेळी खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, माजी आमदार अशोक जांभळे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगरसेवक मदन कारंडे,अजितमामा जाधव, शशांक बावचकर, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, रवींद्र माने, दीपक सुर्वे, संजय कांबळे इ. मान्यवर उपस्थित होते.
Tags
Breaking News