माणुसकी फाऊंडेशन तर्फे जाहीर निषेध.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : (प्रतिनिधी)
इचलकरंजी चंदूर मधील चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करून तिचा खून केला या कृत्याचा माणुसकी फौंडेशन कडून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत.
ऐतिहासिक परंपरा असलेल्या महाराष्ट्रात. संत, महापुरुषांनी स्त्री ला देवाचे स्थान दिले त्याच महाराष्ट्रात अशी घटना घडणे खूप लाजिरवाणी बाब आहे. निकृत्य करणारे बाल गुन्हेगार जरी असले. तरी त्यांना अत्यंत कठोर योग्य ती शिक्षा मिळावी अशी मागणी आम्ही माणुसकी फौंडेशन कडून करीत आहोत.* जर त्यांना योग्य ती शिक्षा झाली नाही तर कायदेशीर नियमांचे पालन करून या विरुद्ध माणुसकी फौंडेशन वाचा फोडेल.असे निवेदन इचलकरंजी बार असोसीएशन चे अध्यक्ष सुनील कुलकर्णी साहेब यांना देण्यात आले...
यावेळी माणुसकी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवि जावळे, अजित उर्फ बंडा पाटील,प्रथमेश इंदुलकर,आकाश नरुटे,मनीष जाधव,प्रताप देसाई,गणेश चिखले,इम्रान शेख, ऋषिकेश चव्हाण,प्रसाद भोसले,मोहसिम मुल्लानी, शुभम राजमाने,ओंकार सुतार,आनंदा इंगवले,अनिकेत धातूंडे,प्रसाद गुगे,श्याम येसाळ,प्रसाद ढोने
Tags
Breaking News