कबनुर मधील जिल्हा परिषद शाळेचे टाटा मोटर्सने रूपच बदलले.
PRESS MEDIA LIVE :. इचलकरंजी :. (प्रतिनिधी ) :
मागील वर्षीच्या अतिवृष्टीने अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हा परिषद कोल्हापूर प्रशासनाच्या सहकाऱ्यांनी टाटा मोटर्स पुणे कंपनी मार्फत कबनूर येथील दत्तनगर मधील विद्या मंदीराचे अंतर्बाह्य रंग काम पूर्ण करण्यात आले टाटा कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून जणू काय या शाळेचे रुपच पूर्ण
बदलून गेले आहे. त्यामुळे या शाळेला एक वेगळ वैभव प्राप्त झाले आहे. सुंदर रंगरंगोटीमुळे आता ही शाळा दिमाखात दिसू लागली आहे. नव्या शैक्षणिक सत्रासाठी दत्तनगरातील हे विद्यामंदिर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नव्या दीमती ने सज्ज झाली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .
गतवर्षी हातकणंगले तालुक्यात अतिवृष्टी झाली महापूर आला त्यामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले, घरे पडली ,जनावरे वाहून गेली. नैसर्गिक आपत्ती मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये काही शाळाही सुटलेल्या नाहीत त्याचाच एक भाग म्हणून दत्तनगरतील जिल्हा परिषद शाळेलाही नुकसान झाले. या नुकसानीचे गांभीर्य ओळखून पुणे येथील टाटा कंपनीने शाळेचे रंग काम करून नेहमीप्रमाणे मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.त्यांनी यातून वेगळा ठसा निर्माण करून दिला आहे.
दत्तनगर मधील या शाळेचे रंग काम पूर्ण झाले ने ग्रामस्थ , शिक्षक व विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहेत. टाटा कंपनीने मक्ते दार डिसेंट डेकोरेटर्स पूनेच्या कामगारांनी व सुपरवायझर निवास क्षीरसागर व जितेंद्र शहा यांनी एक महिन्यापासून परिश्रम घेऊन शाळेला नवसंजीवनी प्राप्त करून दिले या बाबत हातकणंगले तालुका गटशिक्षणाधिकारी गजानन उकिरडे विस्तार अधिकारी नम्रता गुरसाळे केंद्रप्रमुख सूर्यकांत निर्मळे यांनी केलेल्या मदतीबद्दल प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. आता नव्या शैक्षणिक सत्रासाठी दत्तनगर कबनूर मधील हे विद्या मंदिर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. टाटा कंपनी नेहमी सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण आरोग्यासाठी काम करीत आहे. लाखो रुपये खर्च करून शाळा इमारतीचे रंगकाम केले बाबत टाटा कंपनीस केंद्र समन्वयक महादेव गायकवाड मुख्याध्यापक बागडी यांनी आभार मानुन कृतज्ञता व्यक्त केली .
Tags
Latest News