शिक्षकांच्या पास साठी बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल शिक्षक भारतीच्या वतीने
आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी (प्रतिनिधी) :
.
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना शासनाने २०% वाढीव टप्पा अनुदान देण्याचे शासनाने निर्णय घेतला आहे परंतु अद्याप निधी वितरणाचा जी. आर काढला नाही. लाॅकडाऊन काळात विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांना तातडीने विनाअनुदानित शिक्षकांना पगार सुरू करणे बाबत शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. नेमिनाथ बिरनाळे यांनी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांना निवेदन दिले.
.यावेळी ताराराणी आघाडीचे शहरप्रमुख मा. दत्तवाडे व माजी नगरसेवक अहमद मुजावर, को.जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक मा. श्रीशैल मठपती, बाहुबली संस्थेचे मा. श्रीमंधर वांजुळे, दीपक चौगुले व इतर शिक्षक उपस्थित होते.
Tags
Latest News