Press media live : इचलकरंजी ( प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील गौरीशंकर नगर खोतवाडी येथील दानम्मा मंदिर शेजारी असणारा दारू अड्डा संतप्त महिलांनी उद्ध्वस्त करून टाकला. यावेळी महिलांनी दारूबंदीच्या घोषणा देत दारू अड्ड्यावर दगडफेक करीत संबंधित चालकाचा निषेध करीत या परिसरात दारू अड्डा चालू देणार नाही असा इशारा देत पोलिसांची कानउघाडणी केली . खोतवाडी परिसरात अनेक दारूअड्डे असून याबाबत गाव सभेत महिलांनी उठावही केला आहे. महिलांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्या मुळे सर्वांचेच धाबे दणाणल होते.
Tags
Breaking News