इचलकरंजी येथे दीड लाखांचा गुटखा जप्त
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : ( मनु फरास ) :
कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू आहेत का याबाबत माहिती घेऊन त्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजी येथील तांबे मळा परिसरामध्ये छापा टाकून निखील आण्णाप्पा चौगुले (रा.तांबे माळ इचलकरंजी, ता. हातकणंगले) याला ताब्यात घेतले. ही व्यक्ती बेकायदेशीर – रित्या गुटख्याची साठवणूक करून विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या घरासमोरील चारचाकी वाहनातून दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा, २ लाख किंमतीचे वाहन जप्त केले.पोलीसांनी सांगितले की, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गेल्या पावणेदोन वर्षात अवैध व्यवसायाविरोधी कारवाई सुरू ठेवल्याने जिल्हयातील असे व्यवसाय सुरू असणाऱ्यां ठिकानांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवैध व्यवसायाचे अनुषंगाने माहिती काढून कायदेशीर कारवाई
करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पथके तयार करुन अवैध व्यवसायावर कारवाई करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांच्या पथकाला निखील आण्णाप्पा चौगुले (रा.तांबे माळ इचलकरंजी, ता. हातकणंगले) हा व्यक्ती बेकायदेशीर गुटखा विक्री करीत असून त्याच्या राहत्या घराच्या दारात असलेल्या वाहनामध्ये गुटखा विक्री करिता ठेवल्याची गोपनीय माहिती एका बातमीदाराकडून मिळाली. त्याप्रमाणे सहायक पोलीस निरिक्षक सत्यराज घुले व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी याबाबत खात्री करुन इचलकरंजी येथील तांबे माळ परिसरात छापा टाकला.
त्यामध्ये विविध कंपनीचा गुटखा आढळला. या प्रकरणी निखील आणाप्पा चौगुले (वय २९,रा. रिंगरोड,तांबे माळ इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला पोलीसांनी ताब्यात घेवून चौकशी केली. या कारवाईमध्ये विविध कंपन्यांचा सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा व २ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन तपासासाठी ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांकडे जप्त मद्देमाल देण्यात आला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत,सहा पोलीस निरीक्षक सत्यरात घुले, पो. हे कॉ श्रीकांत मोहीते, विजय कारंडे, संजय पडवळ, नरसिंग कांबळे, प्रदीप नाकील यांनी केली.
Tags
Breaking News