इचलकरंजी : 13 जून पासून सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत भाजीपाला विक्री सुरू राहणार.


शहर समितीच्या आढावा बैठकीत निर्णय......
    
   

        

     Press media live..   इचलकरंजी( प्रतिनिधी  )  : 
इचलकरंजी शहरांमध्ये उद्या दि.१३ जून पासून  सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील* *आठवडा बाजार भरत असलेल्या मुळ  ठिकाणी दररोजच भाजीपाला विक्री सुरू राहणार....
   
कोरोणा विषाणूच्या

प्रादुर्भावामुळे इचलकरंजी शहरामध्ये विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज शुक्रवार दि. १२ जून रोजी शहर नियंत्रण समितीची आढावा बैठक नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी व उपनगराध्यक्ष श्री.तानाजी पोवार साहेब..
यांच्या अध्यक्षते खाली आणि शहर नियंत्रण समिती सदस्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये  *आज अखेर शहरात २१ ठिकाणी असलेली भाजीपाला विक्री आजपासून बंद करणेत  आले असुन  उद्या दि. १३ जून पासून भाजीपाला विक्रीच्या नियोजनात बदल करणेत येत आहे. यानुसार उद्यापासून शहरामध्ये  मुळ ज्या ठिकाणी ( शिवाजीराव खवरे मार्केट थोरात चौक,विकली मार्केट, आण्णा रामगोंडा शाळेजवळ, जवाहर नगर पाण्याची टाकी ) आठवडा बाजार भरत असतात त्या ठिकाणी दररोजच सकाळी ७ ते  सायंकाळी५ या वेळेतभाजीपाला विक्री सुरुकरणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यापुढेही फेरीवाले, चहागाडी ,टपरी,खाद्य पदार्थांचे गाडे बंदच ठेवणेचा निर्णयसुद्धा कायम ठेवणेत आला. 
       तरी  भाजीपाला खरेदीसाठी बाहेर  पडणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर कटाक्षाने करणेचा आहे आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे आहे. भाजी विक्रेत्यांनी सुद्धा मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करणेचा आहे. जे भाजी विक्रेते मास्क व ग्लोव्हज तसेच जे नागरिक मास्क   वापरणार नाहीत त्यांच्यावर नगरपरिषदे कडून नियुक्त केलेल्या पथकाकडून दंडात्मक  कारवाई करण्यात येईल याची शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी आणि नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासना कडून करण्यात येत आहे.

       

Post a Comment

Previous Post Next Post