राष्ट्रवादी च्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार असल्याच्या चर्चेवर शिक्का मोर्तब झाला असल्याची चर्चा.
बारामतीत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी येऊन अचानक भेट घेतली आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती. या भेटीत राष्ट्रवादीच्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाला असल्याची चर्चा आहे.
राजू शेट्टी आणि शरद पवार यांच्यात जवळपास अडीच तास ही चर्चा सुरू होती. राजू शेट्टींना विधानपरिषदेचा प्रस्ताव मान्य असल्याचे देखील समजतंय. राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड होणार असून राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयारीत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे.
Tags
Latest News