आदर्श पत्रकार महासंघ (महाराष्ट्रची) औरंगाबाद जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर.
औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी योगेश मोरे.
PRESS MEDIA LIVE :
अहमदनगर सिटीझन : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे दिनांक १८/०६/२०२० गुरुवार रोजी आदर्श पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान सर्जे खान व प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय खडके यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श पत्रकार संघाची बैठक गंगापूर येथे पार पडली.या बैठकीत योगेश मोरे यांचा सत्कार करण्यात आला.सत्काराप्रसंगी हरीश मगर,भूषण बुट्टे, अमोल काटकर,रविंद्र एरंडे,दत्तात्रय जोशी,प्रवीण भाडाईत,कल्याण इंदापुरे,विशाल जोशी,आप्पासाहेब फिंपाळे, गोकुळ लांडे,नागेश देसाई देशमुख,संजय काळे,केशव मुंढे,इंद्रजित कासार,संजय दांडगे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.तसेच योगेश मोरे यांची आदर्श पत्रकार संघटनेच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी योगेश मोरे म्हणाले की,नक्कीच पत्रकार यांच्यावर अन्याय झाल्यास नक्कीच पत्रकारांच्या हितासाठी लढेल आणि सामाजिक कार्य करून समाजसेवा देखील करील अशी माहिती त्यांनी दिली.आणि औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय जोशी,सचिवपदी कल्याण इंदापुरे,कार्याध्यक्ष विशाल जोशी,जिल्हा संघटक आप्पासाहेब फिंपाळे, संपर्कप्रमुख गोकुळ लांडे,सल्लागार प्रवीण भाडाईत,समन्वयक नागेश देसाई देशमुख,संजय काळे आदींची निवड करण्यात आली. मराठी लेखक साहित्यिक योगेश मोरे यांची औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अनेक स्तरातून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Tags
Breaking News