पुरोहित साठी ब्राम्हण घंटानाद आंदोलन
PRESS MEDIA LIVE : अहमदनगर सिटीझन: ( कमलेश शेवाळे ) सोलापूर शहर मध्ये ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री आनंद दवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शाखेच्या वतीने घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले यावेळी ब्राह्मण महासंघ प्रदेश संपर्क उमेश काशीकर व सोलापूर जिल्हाध्यक्ष राघवेंद्र आद्य गुरुजी यांनी सांगितले की गेले दोन महिने झाले लॉकडाऊन मुळे मंदिर बंद असल्यामुळे पुरोहित नारळ विक्रेते फुलहार विक्रेते प्रसाद विक्रेते अडचणीत आले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा ही विनंती केली. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ.नमिता थिटे सोलापूर जिल्हा पुरोहित आघाडी सल्लागार श्रीकांत कुलकर्णी शहर कार्यादक्षा सौ.सारीका कुलकर्णी सौ.शारदा देशपांडे श्री महेश कुलकर्णी रमेश जोगळेकर सुरेश देशपांडे नाशीकचे विभूते सहभागी झाले होते