दौंड . 21 लाखांचा गांजा जप्त .

महिला अधिकाऱ्याच्या कर्तबगारीने शेतकऱ्याचे  बिंग फुटले., 21 लाखाचा गांज्या जप्त. सर्वत्र खळबळ..


Press media live:.  दौंड : दौंड तालुक्यातील  गिरिम येथे गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्या स अटक करून 21 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला 

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुढाकाराने करण्यात आली या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना गिरी म येथे गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाईचे आदेश दिले होते. 

 गिरिं म गावातील शेतकरी दत्तू शंकर शिंदे यांनी तब्बल चार गुंठे क्षेत्रात  सहजा सहज दिसणार नाही  अशा पद्धतीने गांजाची शेती तयार केली होते.

Post a Comment

Previous Post Next Post