सलून व्यवसाय 28 जुन पासून सुरू होणार.
PRESS MEDIA LIVE :
राज्यात सलून सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू करण्यास मात्र तूर्त परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सलूनबाबत सांगोपांग चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सलूनसाठी नियमावली तयार करण्यात असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्कचा वापर, सॅनिटाइझ करणे बंधनकारक असेल, असे सांगण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, तूर्त सलूनमध्ये केस कापण्याचीच परवानगी देण्यात आलेली आहे. दाढीबाबत निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. सलूनमध्ये केस कापण्यासाठी जाणाऱ्याने मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्याचवेळी जो केस कापणारा आहे, त्यानेही मास्क वापरायचा आहे. सोशल डिस्टन्सिंगचे अन्य सर्व नियम पाळणेही सक्तीचे असणार आहे. पुढचे काही दिवस यावर बारीक निरीक्षण ठेवलं जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील, असे परब यांनी स्पष्ट केले.
Tags
Breaking News