होम कोरंटाईन असलेला जि. प. सदस्य मंत्री अनिल परब यांच्या भेटीला
सिंधुदुर्ग :फणसगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर घरी अलगीकरणात असताना महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या भेटीला गेल्याचे उघड झाले आहे. आरोग्य यंत्रणा, मंत्र्यांची सुरक्षा यंत्रणा किती हलगर्जीपणाने काम करते हे आता यातून उघड झाले आहे. यामुळे नागरिकांबरोबरच मंत्र्यांच्या आरोग्याला धोका पोहोचला आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार का यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Shiv Sena ZP member who has been home quarantined comes in contact with Min Anil Parab..who is a member of Maha CMs kitchen cabinet..now this might lead to some major trouble in the Maha CMs core team n specially Matoshree!!
Sena ka Sibal shud take care! pic.twitter.com/uQWgDUtSdq
— nitesh rane (@NiteshNRane)
आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन ही माहिती उघडकीला आणली आहे.
मंत्री अनिल परब हे हरकुळ येथे आपल्या घरी आलेले असताना ही भेट त्यांनी घेतली यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदीप नारकर यांच्या जवळचे नातेवाईक नायर हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात प्रदीप नारकर नेहमीच असतात. यामुळे त्यांनी नियम पाळणे गरजेचे होते. प्रदीप नारकर हे 30 मे रोजी गावात आले व नियमानुसार ते 13 जून पर्यंत घरी थांबणे गरजेचे असताना त्यांनी मास्क वाटपाचे सुद्धा कार्यक्रम केल्याचे उघड झाले आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकतीच सिंधुदुर्गातल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी नुकतीच भेट घेतली. मात्र यात होम क्वारंटाइन असलेले फणसगाव देवगड तालुक्यातील फणस गाव जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप नारकर होते. प्रदीप नारकर यांनी स्वतः जिल्हा परिषद सदस्य असून नियम मोडला. शिवाय त्याने त्यांनी मंत्र्यांसह अनेकांच्या आरोग्याला धोका पोहोचवला आहे. यामुळे प्रदीप नारकर यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Tags
Latest News