सर्वच कामगारांना सुट्टीचा पगार मिळणार.. मा. उपनगराध्यक्ष. रवी रजपुते.
Press media live. इचलकरंजी...( प्रतिनिधी ) : सुट्टीचा पगार सफाई कामगारांना देण्याचा ठराव झाला एक महिन्याचा मिळाला दुसऱ्या महिन्याचा वाटप सुरू आहे परंतु काही सफाई कामगार म्हणून नेमणूक असणाऱ्या पण कामाच्या सोयीसाठी बांधकाम, पाणीपुरवठा, बागकाम खात्यामध्ये कामाच्या सोयीसाठी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, व त्या संबंधित खात्यामध्ये सुद्धा ही मंडळी ऑफिस साफ सफाई, फरशी सफाई, टेबल सफाई, नगरपालिका आवारा साफ सफाई, हे काम आता सध्या त्या ठिकाणी करत असतात परंतु कामगारांना आज तागायत १ रुपाय देखील सुट्टीचा पगार मिळाला नाही, या कामगारांवर अन्याय झालेला आहे.
परंतु आरोग्य अधिकारी संगेवारांच्या बगल बच्चाना सुट्टीचा पगार दिला गेला. याचा जाब व निवेदन देण्यासाठी रवी रजपुते सोशल फाउंडेशनचे प्रमुख रवी रजपुते यांनी नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांच्या भेट घेतली यावेळी संपूर्ण माहिती घेऊन नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी म्हणाले येत्या कौन्सिल समोर विषय ठेवून सुट्टीचा पगार देऊन राहिलेल्या सर्व सफाई कामगारांचा पगार दिला जाईल व कामगारांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी ज्या कामगारांना सुट्टीचा पगार मिळाला नाही ते कामगार उपस्थित होते.
Tags
Breaking News