पाच लाखाचे काम घेऊन दोन लाखाचे झालेली दिसते , या
कामाची सखोल चौकशी होऊन संबंधितावर क** कारवाई करण्याची निवेदना द्वारे मागणी. सर्वत्र खळबळ.
Press media live. शिरढोण ( प्रतिनिधी ) : शिरढोण तालुका शिरोळ येथील सध्या स्मशान भूमी दुरुस्ती कामाची चर्चा सर्वत्र सुरू आहे . या स्मशान भूमी च्या दुरुस्तीकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून पाच लाखाचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून स्मशान भूमीचे दुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचं कसून चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावीअशी मागणी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ यांना दिली आहे. या मागणीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
शिरढोण मधील स्मशानभूमी च्या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना ग्रामपंचायत जनसुविधा पूर्ण अंतर्गत भूमी दुरुस्तीकरिता पाच लाख रूपये मंजुर झाले पण प्रत्यक्षात जागेवर काम पहिले असतात हे काम पाच लाख रुपयांची आहे का ?..हा प्रश्न पडतो. प्रतीक्षा दुरुस्तीचे काम साधारण दोन लाखाच्या आसपास झालेले दिसते बाकीचे काय..? तरी स्मशान भूमीत दुरुस्त्या कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या चौकशीच्या मागणीमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून ठेकेदारांचे झोपा उडाल्याची चर्चा सुरू आहे.
Tags
Breaking News