*आदर्श पत्रकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी श्री. वजीर शेख यांची निवड*
PRESS MEDIA LIVE :अहमदनगर . (प्रतिनिधी) वजीर शेख.
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे दिनांक 13/6/2020 रोजी आदर्श पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री मेहबूब खान सर्जेखान व प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय खडके यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श पत्रकार संघाची बैठक कोरडगाव येथील तुकामाई मंगल कार्यालय येथे झाली. त्यावेळी सर्वानुमते अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी श्री. वजीर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी रमेश काका जोशी यांनी वजीर शेख यांचा सत्कार केला. याप्रसंगी वजीर शेख म्हणाले की, ही जिल्ह्याची जबाबदारी दिल्याने प्रत्येक पत्रकार बांधवांसाठी मी सहकार्य करेल. तसेच तळागाळातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करेल. तसेच कोणावर अन्याय होऊ देणार नाही.
तसेच आदर्श पत्रकार महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष वजीर शेख यांनी जिल्हा कार्यकारिणीत श्री रमेश जोशी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी, पुष्कर सराफ यांची जिल्हा सचिव पदी, जिल्हा कार्याध्यक्ष पदी अफसर शेख, जिल्हा संघटक पदी कुणाल जमदाडे, जिल्हा संपर्कप्रमुख पदी मुंजाभाऊ लकडे, जिल्हा समन्वयक म्हणून समर्थ कुलकर्णी, जिल्हा सल्लागार पदी निजाम पटेल तसेच सदस्य म्हणून राहुल फुंदे, सुधाकर एडके, महेश गुळवे, नसीबखाॅ पठाण यांची नियुक्तीची घोषणा केली.
याप्रसंगी मानव अधिकार सुरक्षा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री अफसर शेख, महासचिव पुष्करजी सराफ, महाराष्ट्र कार्याध्यक्ष कमलेशजी शेवाळे, संपर्कप्रमुख अहमदनगर मुंजाभाऊ लकडे, आबासाहेब एडके, खरा महाराष्ट्र संपादक निजामभाई पटेल, दादासाहेब ऐढे, नशीबखॉ पठाण, गणेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक जिल्हा व तालुक्यात संघटनेचे काम करणार आहे.
यावेळी मंज्याबापू लकडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कमलेश शेवाळे यांनी केले तर निजाम पटेल यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले..
Tags
Breaking News