Press media live : कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापुराने गेल्यावर्षी अतोनात नुकसान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना घटनेच्या वर्षानंतर आर्थिक मदत मंजूर झाली आहे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 41 कोटी 58 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी दिली.
जुलै-ऑगस्ट 2019 ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त बाधितांना मदत वाटप करण्यासाठी वेगवेगळ्या बाबींसाठी आणि वेगवेगळ्या लेखाशिर्ष निहाय सुमारे 321 कोटी 83 लाख रुपयाचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले होते. सदरचे अनुदान नुकसानग्रस्त चे वाटप प्रलंबित असून याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी नुकसान ग्रस्तांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार नुकसानग्रस्त बाधितांना राज्य शासनाने 41 कोटी लाख58 24 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले. याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
Tags
Latest News